महाराष्ट्रात महायुतीची सत्तास्थापना झाल्यानंतर आता विधानसभेचे कामकाज सुरु झाले आहे. सध्या मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. शनिवारी ७ डिसेंबर आणि रविवारी ८ डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. अखेर भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजपने विधानसभा अध्यक्षपदावर दावा करत त्याची जबाबदारी राहुल नार्वेकरांकडे दिली. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक