सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थेला “अमेरिकन अल्बम” या नाटकाच्या निर्मात्या भाग्यश्री देसाई यांनी स्व. सुलभा सबनीस यांच्या स्मरणार्थ ५ लाख रुपयांची देणगी देऊन आपुलकीच्या सामाजिक कार्याला मोठे बळ दिले आहे.
सांगोला येथे दि. १० रोजी “अमेरिकन अल्बम” या भावस्पर्शी नाटकाचा प्रयोग पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन सांगोला येथे आयोजित करण्यात आला होता. आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती या नाटकाच्या निर्मात्या भाग्यश्री देसाई यांनी अध्यक्ष राजेंद्र यादव यांचेकडून घेतली होती. सामाजिक कार्यात मोठे योगदान असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानला त्यांनी आर्थिक मदत करण्याचे आश्वासित केले होते. त्याप्रमाणे दि. १० रोजी नाटकाच्या मध्यंतरात स्व. सुलभा सबनीस यांच्या स्मरणार्थ ५ लाख रुपयांचा धनादेश त्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष माहिमकर यांच्याकडे सुपूर्द केला.
आपुलकीच्या कार्याला भरीव देणगी दिल्याबद्दल त्यांचा छाया यादव यांच्या हस्ते तुळशी हार, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी धनादेश स्वीकारल्यानंतर या देणगीतून आपुलकीच्या वतीने मोठे सामाजिक उपक्रम राबवू असे सांगून देणगीदार भाग्यश्री देसाई यांचे आभार मानले.
स्व. सुलभा सबनिस यांचे स्मरणार्थ नाटकाच्या निर्माते भाग्यश्री देसाई यांनी दिलेल्या ५ लाख रुपयांच्या देणगीतून खरेदी करण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचा लोकार्पण सोहळा भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. यावेळी नाटकातील सर्व कलाकारांचा सत्कार आपुलकी सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. नाटकाच्या शेवटी लकी ड्रॉ काढून विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. खूप वर्षांनी एक चांगले भावस्पर्शी नाटक पाहायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया अनेक नाट्य रसिकांनी यावेळी दिल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक