परभणी प्रकरणी कारवाई करा अन्यथा आंदोलन -बहुजन समाज पार्टीचा इशारा

0

सांगोला (प्रतिनिधी)- परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे वरदळीच्या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीला मनुवादी विचारधारेच्या इसामाने तोडफोड केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आरोपीची कसून चौकशी करण्यात यावे व आरोपीस सक्त कारवाई व्हावे तसेच या षडयंत्रना मागे ज्याचा हात आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर सक्त कारवाई करावे, राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावे असे न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व याचे होणाऱ्या नुकसानीला केंद्र शासन व राज्य शासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला. अशा पद्धतीचे निवेदन बहुजन समाज पार्टी सांगोला विधानसभा युनिट च्या वतीने मा. संतोष कणसे (तहसीलदार सांगोला) यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांना देण्यात आले.

यावेळी मिलिंद बनसोडे (सोलापूर जिल्हा प्रभारी) कुंदन बनसोडे (मा. जिल्हा सचिव) सुभाष गाडे सांगोला (विधानसभा प्रभारी), अजय ठोकळे सांगोला (विधानसभा महासचिव) शशिकांत गडहिरे (युवक अध्यक्ष), गुलाब जाधव, सुहास बनसोडे, किरण बनसोडे, महादेव कांबळे, अजय सावंत, कुबेर मंडले, गणेश काशीद, राजू माने, विशाल कांबळे, दुर्योधन बनसोडे, शौकत खतीब, अमित बनसोडे, प्रेम मोटे, अमित जाधव, विकास बनसोडे, साहिल कांबळे, दीपक कल्याण काटे, जीवन दत्तात्रय काटे, अनिकेत दत्तात्रय काटे, नितीन तोरणे आदी पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here