रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे राज्यशास्त्र विभाग व सांस्कृतिक विभाग आयोजित रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल यांनी शरद पवार साहेबांचे नेतृत्व हे विद्यार्थ्यांसाठी कसे प्रेरणादायी आहे हे आपल्या व्याख्यानांमधून सांगितले .शरद पवार साहेबांचे जीवन हे बारामती तालुक्यामधील छोट्याशा काटेवाडी या ग्रामीण शेतकरी कुटुंबामध्ये घडलेले आहे. सध्याच्या सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या घरी पिकलेली फळे व भाजीपाला घेऊन बारामती व फलटण या ठिकाणी बाजारामध्ये जाऊन विक्री करण्याचे काम केले होते. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या अंगी असलेले संघटन कौशल्याचा वापर करून त्यांनी कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थी प्रतिनिधीची, सर्वप्रथम पुण्यासारख्या शहरांमध्ये निवडणूक लढवून वर्ग प्रतिनिधी झाले. कॉलेजचा विद्यार्थी प्रतिनिधी कसे झाले व त्यानंतर पुण्यातील इतर महाविद्यालयांमध्ये सुद्धा पवार गट म्हणून कशा पद्धतीने निवडणुका लढवल्या गेल्या व त्या जिंकल्या व कॉलेजचा प्रतिनिधी या नात्याने प्राचार्य यांची परवानगी घेऊन यशवंतराव चव्हाण यांना वार्षिक पारितोषिक वितरणास प्रमुख पाहुणे म्हणून आणले होते. या कार्यक्रमाच्या भेटीतूनच यशवंतराव चव्हाण साहेब यांनी त्यांना पुढे समाजकारण व राजकारणात संधी दिली याचे सविस्तर विवेचन डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले.
तसेच अनेक संघर्षातून शरद पवार साहेबांचे नेतृत्व कसे विकसित होत गेले व आरोग्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने मात केली. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त काळात शरद पवारांचे रयत शिक्षण संस्थेमधील योगदान कसे उपयुक्त आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुनील हेळकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांची ओळख उपप्राचार्य प्रा.अशोक कदम यांनी करून दिली. तर आभार डॉ. संगीता पैकीकरी व सूत्रसंचालन डॉ. अलका घोडके यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक