ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे १६ डिसेंबर पासून ३ दिवस सुश्राव्य प्रवचन
सांगोला ( प्रतिनिधी )- श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव श्रीराम मंदिर व ध्यानमंदिर, सांगोला येथे प्रतिवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष वद्य १ सोमवार दि. १६ डिसेंबर ते बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ असा साजरा होत आहे. श्रीराम सन्निध सद्गुरु आहेतच या भावनेने या परिसरात भीक्षा, भजन, मौन, गायन, कीर्तन, प्रवचन, उपासना, अखंड १३ तासाचा जप इ. कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी ६ वा. मंगलधून व काकडा श्रीराम मंदिर व ध्यान मंदिर, रोज सकाळी ६.३० वा : राममंदिर येथे सामुदाईक जप व उपासना.
३ दिवसीय प्रवचनमाला सोमवार दि. १६/१२/२०२४ ते बुधवार दि. १८/१२/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ध्यान मंदिर सांगोला येथे होणार असून पंढरपूर येथील संत माणकोजी महाराज बोधले यांचे विद्यमान वंशज ह.भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांचे “राम म्हणता रामची होईजे” या विषयावर ३ दिवस सुश्राव्य अशी प्रवचन माला होणार आहे. शुक्रवार दि. २०/१२/२०२४ रोजी सायं. ६ वा. सज्जनगड येथील सेवेकरी ह.भ.प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे यांचे नारदीय कीर्तन होणार आहे.
शनिवार दि. २१/१२/२०२४ रोजी सायं. ६ वा. ह. भ. प. श्री. गुरुनाथ महाराज कोटणीस सांगली यांचे प्रवचन
तर रविवार दिनांक २२/१/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ध्यान मंदिर सांगोला येथे श्री. दयानंद बनकर व त्यांचे सहकाऱ्यांचा भजन संध्या हा भावगीत, भक्तीगीत, अभंग, गौळणीचा बहारदार कार्यक्रम होईल.
बुधवार दिनांक २५/१२/२०२४ रोजी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत श्रीमती शुभांगी कवठेकर यांचे पुण्यतिथीचे कीर्तन व श्रीमहाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होईल. नंतर महाराजांची पालखी व नगर प्रदक्षिणा शोभायात्रा निघेल. दुपारी १२ वाजता आरती व १२ ते २ महाप्रसाद ध्यानमंदिर, सांगोला येथे होईल.
तरी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन नामसाधना मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक