सोनंद हायवे ते जवळा जोडला जाणारा रस्ता असून अडचण नसून खोळंबा

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी) :शासन स्तरावरून रस्त्यासाठी भरपूर निधी येत असताना सुद्धा कडलास ता.सांगोला येथील कोळी आलदर वस्ती येथील सोनंद हायवे ते जवळा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून तेथून ये जा करणाऱ्यास काटेची कसरत करत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

 

या रस्त्यासाठी पूर्वी दहा लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला होता. पण कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्यांनी मुरूम टाकण्या ऐवजी माती टाकल्यामुळे हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्याऐवजी नुसता चिखलच दिसतोय व सर्व रस्त्यावर खड्डे पडलेत. तरी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून मिळावा अन्यथा विधानसभेला मतदानासाठी बहिष्कार टाकला जाईल असा तेथील जनतेकडून इशारा देण्यात आला.

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here