राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर, फडणवीसांकडेच गृहखांत, पाहा संपूर्ण यादी

0

राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे.

कोणाला कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस – गृह

अजित पवार – अर्थ

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण

उदय सामंत – उद्योग

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास

जयकुमार रावल – मार्केटिंग, प्रोटोकॉल

अतुल सावे – ओबीसी

अशोक उईके – आदिवासी

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

दत्तात्रय भरणे – क्रीडा

आदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर देखील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. अधिवेशन सुरू असताना मंत्र्यांना खाते वाटप होईल अशी अपेक्षा होती. मात्र अखेर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here