सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेत दैनिक सकाळ समूहाने सकाळच्या (सोलापूर आवृत्ती) २३ व्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते आपुलकी प्रतिष्ठानचा मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
सिद्धेश्वर रेल्वे ऑफिसर्स क्लबच्या प्रांगणात प्रसिद्ध लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, सकाळ ‘चे संपादक संभाजी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान केला. यावेळी युनिट हेड रूपेश मुतालिक, सरव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) दिनेश ओक, उपसरव्यवस्थापक (जाहिरात) मिलिंद भुजबळ तसेच सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, अनिरुद्ध पुजारी, दिपक शिनगारे, अजयकुमार बाबर, सुरेशकाका चौगुले, अच्युत फुले, दत्तात्रय नवले, प्रभाकर सरगर, दिपक कुलकर्णी, काशिलिंग सरगर, श्रीकांत देशपांडे, सुनिल मारडे, संदीप पाटणे, अरविंद डोंबे आदींनी हा सन्मान स्वीकारला.
दैनिक सकाळने आपुलकीच्या कार्याची दखल घेत हा जिल्हास्तरीय सन्मान केल्याबद्दल आपुलकीच्या कार्याला निश्चितच मोठे प्रोत्साहन मिळणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी सांगितले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक