युवा महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे श्री. सचिन प्रकाश मागाडे यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोकांना मानसिक आधार देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याचे त्यांचे कार्य हे लोकोपयोगी व नाविन्यपूर्ण आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुरूंकडून ज्ञान ग्रहण करून आज ते प्रमाणित लाईफ कोच, काऊन्सलर, एन.एल.पी. प्रॅक्टीशनर आहेत. मनःस्पर्श माईंड इन्स्टिट्यूटची स्थापना करून ते लाईफ कोच व समुपदेशक म्हणून सांगोला सोबतच ऑनलाईन माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात विविध विषयांवर सेमिनार व कार्यशाळा घेतात तसेच डी.एम.आय.टी या आधुनिक टेस्टद्वारे करिअर समुपदेशन, पालक-पाल्यासाठी समुपदेशन, वैयक्तिक समुपदेशन व वैवाहिक समुपदेशनाच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा देण्याचे कार्य करतात.
व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी व अंतर्मनाच्या अफाट शक्तीचा वापर करून व्यक्तीला सामर्थ्यवान बनविण्यासाठी ते कार्यरत आहे. सध्याच्या धावपळीचा परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होत आहे अशा परिस्थितीत खचलेल्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचे काम हा युवक गेल्या 6 वर्षांपासून करीत आहे म्हणूनच आजच्या युवकांसाठी तो एक प्रेरणा आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक