नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी कडलास मध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. कडलास मॅरेथॉनच्या या चौथ्या पर्वाचा एकच उद्देश होता तो म्हणजे तरुणाई आरोग्य चळवळीकडे ओढली जावी ,व्यसनाधीनतेकडे नव्हे. या स्पर्धेत 400 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला.
कडलाचे सुपुत्र कार्यकारी अभियंता श्री सचिन पवार यांचे संकल्पनेतून ही स्पर्धा पार पडली. 10km ,5km व 3km गटात स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे विजेते व गट पुढील प्रमाणे: 10km पुरुष प्रथम स्वराज देवानंद पाटील ,सांगली द्वितीय सुशांत प्रकाश सरगर ,कोळा तृतीय सोमनाथ शिवाजी ऐवळे तृतीय महिलांमध्ये प्रथम अनुष्का अमरदीप शिंदे, मार्डी द्वितीय अक्षरा शिवाजी पवार तृतीय गायत्री संतोष मासाळ.
5km मुले प्रथम ओंकार शिवाजी भुसनर द्वितीय हरिप्रसाद शिवाजी ऐवळे तृतीय शशिकांत चव्हाण मुली प्रथम स्नेहल भाऊसाहेब खरात द्वितीय अनुश्री हरिदास मासाळ तृतीय भाग्यश्री सुधीर गिड्डे
3km मुले प्रथम बालाजी सुरेश गिड्डे ,तडवळे द्वितीय यश सुधीर गिड्डे तृतीय साहिल धर्मेंद्र ऐवळे मुली प्रथम स्नेहल विलास गिड्डे द्वितीय राजेश्वरी संभाजी किरकद तृतीय रोहिणी राजेंद्र पवार कडलास
या स्पर्धेनंतर श्री उद्धव बुवा गायकवाड, श्री अतुल वाघमोडे, श्री शशिकांत भजनावळे, श्री सिद्धेश्वर ढेबे यांनी नाश्ता व केळी वाटप केले.
बक्षीस वितरण श्री सचिन पवार, वैशाली पवार, अनुराधाताई पाटील ,मुख्याध्यापिका संगीता शिंदे ,प्रा. संतोष कांबळे, डॉ. शैलेश डोंबे, श्री दीपक टापरे DK पाटील सर, सुनील भोरे सतीश राऊत, भारत इंगोले, अण्णासाहेब गायकवाड सर यांचे शुभहस्ते करण्यात आले . कडलास मॅरेथॉन संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक