आदित्य काशिनाथ साळुंखे याची महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या असिस्टंट मॅनेजरपदी निवड झाल्याबद्दल त्याचा मित्रपरिवार, मान्यवर व विविध संस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
आदित्य याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विविध पदाकरिता ऑगस्ट मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेतही तो उत्तीर्ण झाला व त्यानंतर नोव्हेंबर मध्ये मुलाखत झाल्यानंतर त्याची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्याच्या या यशानंतर तो रविवारी सांगोल्यात आला असता मित्रपरिवार, नातेवाईक यांनी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली व नंतर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी, मित्रपरिवार, मान्यवर, नातेवाईक, विविध संस्था यांच्यामार्फत सत्कार करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
आदित्यचे १ ते ४ थी पर्यंतचे शिक्षण जि. प्र. शाळा नं १ छत्रपती शिवाजी चौक सांगोला, ५ वी ते १० वी – सांगोला विद्यामंदिर सांगोला, ११ ते १२ वी – मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण, जि – सातारा, Bsc Agriculture Degree- लोकनेते मोहनराव कदम कॉलेज ऑफ अग्रिकल्चर, कडेगांव, सांगली येथे झाल्यानंतर सारथी एज्युकेशन क्लासेस संभाजीनगर येथे अभ्यास चालू होता. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक