शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सांगोला तालुका प्रमुखपदी सुरज काळे यांची निवड करण्यात आली आहे .
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या प्रमुखपदी सुरज काळे यांची निवड करण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या समन्वयक या पदासाठी निवड करण्यात येत आहे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालय राखीव खटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्ण मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे या संदर्भात योग्य मार्गदर्शनाखाली सदैव तत्पर राहावे असे सांगण्यात आले आहे. गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करण्याच्या असलेल्या गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे याकरता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोपरी ठाणे येथे मुख्य कार्यालय करण्यात आलेले आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तालुका प्रमुखपदी सुरज काळे यांची निवड झाल्याबद्दल सुरज काळे यांचा श्री.संजय काळे गुरुजी यांच्या परिवाराच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटा देवून सत्कार करण्यात आला.यावेळी संजय काळे गुरुजी, आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर संकेत काळे, विनोद काळे, औदुंबर काळे, शेखर कारंडे इ .उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक