प्रतिनिधी: (शशिकांत कोळी)- नॅशनल लेव्हल अॅबॅकस काॅम्पीटीशन स्पर्धेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंद येथे इ. ४ थी मध्ये शिकत असलेली कु. स्वरा वल्लभ कोकाटे हीने अचिव्हर्स ट्राॅफी अंतर्गत घेण्यात आलेल्या अॅबॅकस स्पर्धेत ब्राँझ मेडल व प्रशस्तीपत्रक मिळवून शाळेच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.
अॅबॅकस व वेदिक गणित यामुळे कोणतेही गणितीय भागाकार,गुणाकार,वजाबाकी तसेच ९९ पर्यंतचे पाढे व बरीचशी किचकट वाटणारी आकडेमोड अगदी जलद गतीने करता येते. यामुळे विद्यार्थी स्काॅलरशिप,मंथन किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेला धाडसाने सामोरे जाऊ शकतात.
लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंद ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही.त्यामुळेच ही शाळा नेहमी शहरातील इतर नामवंत शाळेबरोबर नेहमीच स्पर्धेत असते.
कु.स्वरा कोकाटे हिला मिळालेल्या यशाबद्दल संस्था सदस्या सौ. रजनी भोसले यांच्या हस्ते व मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महांकाळ, पर्यवेक्षिका सौ. सुषमा ढेबे,प्राचार्य हेमंत आदलिंगे, पर्यवेक्षक प्रा. सुभाष आसबे,श्री,मनोहर गायकवाड,प्रा. आबासाहेब कोळी,श्री.अमोल केंगार व सर्व शिक्षक,शिक्षिका यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
स्वरा कोकाटे ही विद्यालयातील सहशिक्षिका सौ. रोहिणी कोकाटे यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष इंजि. बाबासाहेब भोसले. सचिव आनंदराव भोसले, संस्था सदस्या सौ. अनिता भोसले आदि सर्वच मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक