जि. प. प्राथमिक शाळा टोणेवाडी येथे भोगी सणानिमित्त भाजी भाकरी कार्यक्रम

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): दि. 13 जानेवारी 2025 रोजी जि. प.प्राथमिक शाळा, टोणेवाडी, ता जत या ठिकाणी भोगी सणानिमित्त माझी भाकरी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेच्या स्वयंपाकी सौ सखुबाई खिलारे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भाकरी बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्याप्रमाणे शाळेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी भाकरी बनवण्याचा आनंद घेतला .या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग पवार सर व सहशिक्षक श्री सचिन पोळ सर व आबुबकर तांबोळी सर यांनीही भाकरी बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आवडीने भाग घेतला त्याचबरोबर भोगी निमित्त सर्व भाज्यांची मिक्स भाजी, स्वतः बनवलेली भाकरी, हरभरा-मटकी उसळ व भात असा आहार विद्यार्थ्यांना दिला. या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये शिवाजी सचिन घोडके या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आला व विद्यार्थिनींमध्ये सरिता ज्ञानू हिप्परकर ही चौथीतील विद्यार्थिनी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी भोगी निमित्त बनविलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनण्यासाठी सहकार्य करतो. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार असल्याने व त्यांचे स्थलांतर होत असल्याने हा उपक्रम त्यांना स्वयंपूर्ण होण्यास मदत करतो. गटशिक्षणाधिकारी माननीय राम फरकांडे साहेब, माननीय विस्तारअधिकारी अनसार शेख साहेब व सनमडी केंद्राचे केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझी भाकरी हा उपक्रम प्रशाळेत राबविण्यात आला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here