डोंगरगावच्या शलाका काळेचे उत्तुंग यश, जर्मनीच्या कंपनीमध्ये मिळाले 54 लाखाचे पॅकेज

0

सांगोला तालुक्यातील शलाका संजय काळे हिची जर्मनी (Dortmund) येथील प्रतिष्ठित अशा Tintometer GmbH कंपनी मध्ये एम्बेडेड सिस्टम इंजिनीअर म्हणून निवड झाली आहे. यासाठी तिला कंपनीकडून वार्षिक 54 लाखाचे पॅकेज मिळाले आहे. शलाका ही डोंगरगाव ता.सांगोला येथील रहिवाशी व सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक संजय काळे गुरुजी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षिका सौ.वंदना काळे यांची कन्या आहे.

शलाकाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे झाले. पुढे माध्यमिक शिक्षण पुणे येथील हुजूरपागा शाळा आणि उच्च माध्यमिक शिक्षण मॉडर्न कॉलेज पुणे येथे झाले. त्यानंतर शलाकाने पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी विषयात बी टेक पूर्ण केले आहे. तर जर्मनी येथील कोबर्ग युनिव्हर्सिटी मधून सेन्सर टेकनॉलॉजी मध्ये मास्टर पूर्ण केले आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे व तिच्या पालकांचे सर्वत्र कौतुक केले जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here