लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अजितदादांची मोठी घोषणा

0

लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये नाही तर 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलं होतं. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं, त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा लाडक्या बहिणींचा असल्याचं बोललं जात आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान जानेवारीचे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत आता अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.

काय म्हणाले अजित पवार? 

माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थिती चालूच राहणार आहे. काळजी करू नका. फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे, तिचा ऊस चांगला जातो, त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहे. पण ही योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम महिला आणि बालविकास विभागाने केलं आहे. परवाच या योजनेसाठी 3700 कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे. 26 तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हाप्ता जमा होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील जानेवारीच्या हाप्त्याबाबत माहिती दिली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here