माढा : रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने केवड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. अँड. बाळासाहेब पाटील हे होते.
याप्रसंगी बोलताना ते असे म्हणाले की, विद्यार्थी दशेमध्येच विद्यार्थ्यांच्या अंगी समाजसेवेचे धडे मिळण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना ही अत्यंत उपयुक्त आहे, देशाचे भावी नेतृत्व अशा उपक्रमांमधूनच घडत असते. या कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी केवडचे सरपंच राजेद्र पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष भारत लटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सूत्र संचालन डॉ. वंदना कवितके यांनी केले. व आभार प्रा. शुभम चवरे यांनी मानले.
या कार्यक्रमास उपसरपंच नितीन पाडुळे, प्रा.वैशाली गुंड, डॉ. सतीश घाडगे, प्रा. समाधान कदम व कार्यालय प्रमुख हनुमंत खपाले व समाधान नेहतराव यांचेसह विद्यार्थी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक