प्रतिनिधी (शशिकांत कोळी): भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या- ज्या महान विभूतींनी आपले आयुष्य वेचले,त्यातील सर्वोत्तम व्यक्तिमत्व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती लक्ष्मीदेवी विद्यामंदिर,सोनंद या शिक्षण संकुलात साजरी करण्यात आली. यावेळी जेष्ठ शिक्षक प्रा. आबासाहेब कोळी यांचे हस्ते सुभाषबाबूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये सिनीअर केजी मधून शिवन्या राहुल चव्हाण,सानवी सचिन जाधव तसेच प्राथमिक विभागातील नम्रता हेमंत जाधव,परी गोरख केंगार, आरव अनिल महाडिक यांनी नेताजींच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल माहिती दिली. यावेळी प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक- शिक्षिका, सेवक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक