जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा घेरडी येथे बाल आनंद मेळावा संपन्न

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): घेरडी जिल्हा परिषद केंद्र शाळा नेहमी अनेक उपक्रम राबवित असते त्यातून काही काही मुलांना शिकण्यास मिळत असते त्याचाच एक भाग म्हूणन मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे म्हूणन या शाळेने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते.

बाल आनंद मेळाव्याचे उदघाट्न घेरडी गावच्या विदयमान सरपंच सौ. धुरपाबाई देवकते यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी केंद्र प्रमुख अमोगसिद्ध कोळी, मॉडर्न हायस्कुल व जुनिअर कॉलेज चे प्राचार्य विठ्ठल घुटूकडे, सामाजिक कायकर्ते परमेश्वर गेजगे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच धुरपाबाई देवकते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी टकले, उपाध्यक्ष शितल जगधने, सदस्या व बिजल गेजगे. माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सलीम खलिपा, माजी सरपंच अमीर आतार, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर गेजगे,जवाहर विद्यालय उपमुख्याध्यापक मनोज माने, मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य विठ्ठल घुटूकडे, प्राथमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक विलास पाटील,आरोग्य सेवक हंगीरगे संतोष गायकवाड, आरोग्य सेवक आरोग्य केंद्र घेरडी शंकर मागाडे,केंद्र प्रमुख अमोगसिद्ध कोळी, मुख्याध्यापक बंडू आदलिंगे, घेरडी केंद्र शाळा व केंद्र शाळा अंतर्गत सर्व प्राथमिक शाळा शिक्षक व शिक्षिका उपस्थितीत होते.प्रास्ताविक पदवीधर शिक्षक विजयकुमार भजनावळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक बंडू आदलिंगे यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here