माढा: रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने मौजे केवड तालुका माढा येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी असे प्रतिपादन केले की खेड्यांचा विकास आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात करावयाचा असेल तर तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व गावातील सामाजिक कार्य करणारे युवक यांचा समन्वय साधून गावचा विकास झाला पाहिजे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना मतदारांसाठी प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मा. मीनलताई साठे उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी श्रम करताना लाजू नये व श्रम हीच प्रतिष्ठा समजून काम करावे तरच तो आयुष्यात यशस्वी होतो. या सात दिवसीय शिबिरामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या श्री क्षितिज गायकवाड व कु.मनीषा बावळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर , माढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे , केवड गावचे सरपंच राजेंद्र पाटील, उपप्राचार्य अशोक कदम, विद्यापीठ अधिकारी विजय पाटील, भैरवनाथ पाटील, रघुनाथ मिरगणे, हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले. व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. चतुर्भुज गिड्डे यांनी करून दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना कवितके यांनी केले. व आभार रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष भारत लटके यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अशोक लोंढे, कार्यालय प्रमुख हनुमंत खपाले, प्रा. डॉ. सतीश घाडगे, प्रा. संकल्प बारबोले, प्रा. शुभम चवरे , प्रा. लक्ष्मण जतकर, प्रा. वैशाली गुंड, प्रा. प्रसाद पवार, श्री.समाधान नेहतराव यांनी विशेष परिश्रम घेतले . या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक