सांगोला: बसचालकाने प्रसंगावधान दाखवून सांगोल्यात दोन विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले आहे. सांगोल्यातील एस.टी. स्टॅण्डच्या बाहेर हा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगोला आगाराच्या बसचालकाने प्रसगांवधान राखत एस.टी. चे ब्रेक जोरात दाबत बस थांबविल्यामुळे मोठा अपघात टळला आणि दोन विद्यार्थ्यांचा जीवही वाचला. सांगोला आगारातील बस चालक उमेश पवार रा. वाटंबरे (सध्या रा. सांगोला) असे बस चालकाचं नाव असून सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती की, गुरुवार दि.23 रोजी सांगोला शहरातील कोष्टी गल्ली येथील चि. प्रसाद कांबळे व चि. पार्थ दिवटे सायंकाळी 5:15 वाजता ट्युशन्स संपवून भोपळे रोडला रस्त्याचे काम चालू असल्याने मोठ्या बस स्टॅण्डच्या समोरील रोडने येत होते. यावेळी दोन्ही तरुणांनी मोटारसायकलवर जात असताना स्पीडब्रेकर वर अचानक ब्रेक दाबल्याने दोघेही उडून विरुद्ध बाजूला समोरून येणाऱ्या एस.टी. बसच्या चाकासमोर अचानक पडले. ही बाब एस.टी. चालकाच्या लक्षात येताच एस.टी बस चालकाने प्रसंगावधान दाखवून अक्षरशः ब्रेक वर उभा राहून ब्रेक दाबून बस थांबवत मोठा अनर्थ टाळला. त्यामुळे दोन्ही मुलांचा जीव वाचविला. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळेच आज दोन विद्यार्थ्यांचा प्राण वाचल्याने या बस चालकाचे सर्वत कौतुक होत आहे.
ही घटना दोन्ही विद्यार्थ्यांच्या परिवारास समजताच दोन्ही कुटुंबियांकडून बसचालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक श्री. विकास पोफळे, वाहतुक अधिक्षक पंकज तोंडे, वाहतुक निरीक्षक सागर कदम, वरिष्ठ लिपीक श्री. प्रतापसिंह टकले यांच्यासह राजकुमार कांबळे, आनंदकुमार कांबळे, प्रशांत दिवटे, अॅड. उदय दौडे उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक