बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षकांनी प्रशिक्षित व्हावे: डॉ. सचिन सुर्वे 

0

माढा: माढा येथील रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय व मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहादिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम मुक्स (MOOCs) या विषयावर आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्रातील समन्वयक डॉ. सचिन सुर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षकांनी स्वतःला प्रशिक्षित करून घेणे काळाची गरज आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या अध्ययन-अध्यापन पद्धतीमध्ये व्हायला हवा. शासनाच्या नियमानुसार चाळीस टक्के ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व शिक्षकांनी मूक्स या विषयावर प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. उत्तम दर्जाचे प्रशिक्षित शिक्षक तयार झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांना खूप मोठा लाभ होणार आहे. या दृष्टिकोनातून शासनाने महास्वयम प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा मानस केला आहे.

उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत असणे समाज आणि विद्यार्थी हितासाठी महत्त्वाचे आहे. आजच्या काळातील विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा स्वीकार शिक्षकांनी करायला हवा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे व प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नामदेव शिंदे यांनी केले. महाविद्यालयाच्या पीएम उषा योजनेची माहिती पीएम उषा योजनेचे समन्वयक डॉ सतीश घाडगे यांनी दिली. पाहुण्यांचा परिचय प्रा. अशोक लोंढे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. अशोक लोंढे, डॉ. जयवंत पालकर, डॉ. वंदना कवितके यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. अशोक कदम यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य एकनाथ खांडवे यांनी मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रामध्ये स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एस. वांगीकर यांनी मूक्स विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी मूक्सचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म त्याची माहिती सांगून प्रात्यक्षिक ज्ञानही दिले. शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेत असताना कोणकोणते कोर्स निवडावेत, आपण घेतलेल्या ज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने करून देता येईल. याविषयीची माहिती दिली. शिक्षकांनी आपल्या विषयाच्या संदर्भाने मुक्स कोर्स तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे यावेळी त्यांनी दिली. यावेळी डॉ. जयवंत पालकर यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्रा. पूजा लोखंडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. श्रीधर रेवजे यांनी केले. या कोर्ससाठी विविध महाविद्यालयातून जवळपास 36 शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

दिनांक 27 जानेवारीपासून ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत हा सहादिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम महाविद्यालयामध्ये होणार आहे. यामध्ये डॉ. हरिश्चंद्र परबत (मुंबई), डॉ. रामकिशन भिसे (मुंबई), डॉ.सविता देसाई (कोल्हापूर), डॉ. प्रताप नाईकवाडे (पुणे), डॉ. अमोल चव्हाण (पुणे), डॉ. सुनील काळेकर (पुणे), डॉ. प्रशांत पवार (पंढरपूर), डॉ. ए.के. शेख (सोलापूर), डॉ. अमर कांबळे (पंढरपूर), डॉ. प्रभाकर कोळेकर (सोलापूर), डॉ. श्रीराम राऊत (सोलापूर) या सर्वांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here