कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथे सीए, सीएस व सीएम फाउंडेशन एक्झामिनेशन ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न

0

माढा: रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा. वाणिज्य विभाग आयोजित वन वीक प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग प्रोग्राम हा कार्यक्रम पीएम उषा योजनेअंतर्गत दिनांक 20 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये संपन्न झाला आज दिनांक 25 जानेवारी रोजी समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे वित्त व लेखा अधिकारी सीए डॉ. महादेव खराडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सीए सीएमए व सी एस या परीक्षा संबंधी मार्गदर्शन केले. त्यावेळेस बोलताना त्यांनी जिद्द चिकाटी प्रेरणा या गोष्टी विद्यार्थ्याने आत्मसात कराव्या व अभ्यासापूर्वी लक्ष केंद्रित करून आपला निकाल चांगला यावा या दृष्टिकोनातून अभ्यास करावा असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाणिज्य क्षेत्रातील सर्वात टॉपच्या संधी म्हणून या क्षेत्राची निवड करावी असे मत व्यक्त केले त्यावेळी त्यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासाची सचोटी व अभ्यास करण्याची मानसिकता तसेच वेळेचे नियोजन यावरती मार्गदर्शन केले. 20 जानेवारीपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमांमध्ये सीए सचिन भट्टड, सीए ऋषिकेश चव्हाण, सीए आशिष नकाते, सीए काजल हांडे, सीएस सॅम्युअल अंथनी, सीए ज्योती राऊत, सीए अंकिता भांगे, सीए दीप्ती कदम, सीए सूर्यकांत कणसे, प्रा. प्रशांत नरखडे डॉ. सतीश घाडगे श्री. गणेश गुंड यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. अशोक कदम यांनी केले सूत्रसंचालन प्रा. समाधान कदम व प्रा. मोहिनी गुरव यांनी केले तर आभार प्रा. शुभम चवरे यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here