गौडवाडी (शशी हातेकर): शुक्रवार दि.24/1/2025 रोजी शा.व्य.स.,माता पालक,ग्रामस्थ यांचे सहकार्याने बालआनंद मेळाव्यासाठी मान्यवर उपस्थित होते.शा.व्य.स.अध्यक्ष श्री नाना गडदे,श्री आनंदा आलदर,श्री समाधान वाघमोडे,मेजर श्री आण्णासो गडदे,राजु गडदे,संजय गडदे,श्री शिवाजी शिंगाडे,माता पालक गट ,श्रीम.सुजाता माने (बनसोडे)मॅडम ,सौ.नंदा गडदे .यांचे उपस्थितीत अध्यक्षांचे हस्ते उदघाटन करणेत आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी गुळीग यांनी मान्यवरांचे स्वागत केले.श्रीम.सुजाता माने (बनसोडे)मॅडम यांनी वजन मापन या विषयी विद्यार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले.मेळाव्यात वडापाव,भेळ,भाजीपाला,कांदाबटाटा,मंच्युरियन,डाळींब ,जिलेभी,खाज्या इ.स्टाॅल लावुन मुलांनी ग्राहकांना मालविक्रीसाठी आवाज देऊन माल विक्री केला.सर्व पालकानी माल खरेदीसाठी सहभाग घेतला .मालविकल्याचा आनंद बालकांच्या चेहर्यावर दिसत होता.उपस्थित सर्व मान्यवराचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी गुळीग (गुरुजी)यांनी मानले.बालआनंद मेळाव्यास श्रीम.सुजाता माने(बनसोडे)मॅडम,विद्यार्थी,शा.व्य.स.पालक यांनी परिश्रम घेतले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक