सांगोला (प्रतिनिधी)- ११ ऑगस्ट रोजी स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल सांगोलाच्या कॅम्पस मध्ये संपन्न झाले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्योतिबा हुरदुके यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त सर्वानी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. विठ्ठलराव शिंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी असे सांगितले कि स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली त्यांचा वारसा आपल्याला जपण्यासाठी आपण सर्वांनी रक्तदान करून तो वारसा जिवंत ठेवूया.
सदर कार्यक्रमास शेकापक्षाचे जेष्ठ नेते मा. श्री. मारुती (आबा) बनकर, संस्था सदस्य प्रा. अशोकराव शिंदे, प्रा. दीपक खटकाळे, प्रा. जयंत जानकर व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य प्रा. केशव माने सर व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य श्री. दिनेश शिंदे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अशोक कांबळे, सौ.इंदिरा येडगे मॅडम, सौ.स्मिता इंगोले मॅडम,उपप्राचार्य श्री संतोष जाधव, डॉ. दादासाहेब जगताप, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा.डॉ.जोतिबा हुरदुखे, डॉ.नारायण आदलिंगे , राष्ट्रीय सेवा योजनेमधील सदस्य प्रा.डॉ.जयश्री काशीद, प्रा.हणमंत कोळवले, डॉ. शितल शिंदे, श्री धनंजय गायकवाड न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा.संतोष राजगुरू, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुप्रिया खंदारे, प्रा.अक्षय माने, तुषार मेटकरी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी व सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ.जोतिबा हुरदुखे, प्रास्ताविक प्रा.अशोक वाकडे व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. जे.व्ही ठोंबरे यांनी केले आहे.
स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराबरोबर भव्य वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. सदर वक्तृत्व स्पर्धेचे सूत्र संचालन प्रा.डॉ. के.एस. माने सर, श्री. प्रकाश बाबर सर, सौ. जयश्री पाटील मॅडम यांनी केले आहे. या स्पर्धेमध्ये ज्यूनिअर गटातून प्रथम क्रमांक विभागून हर्षद संजय यमगर न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज सांगोला आणि विद्या विजय कांबळे माध्य. व उच्च महाविद्यालय शिवणे यांनी पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक आरती नाना शिनगारे विद्यामंदिर व ज्यू. कॉलेज सांगोला आणि तृतीय क्रमांक तनुजा सुनिल मोरे शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला यांनी पटकवला आहे.
महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांक कु. भगवंत रामचंद्र कोळी सांगोला महाविद्यालय सांगोला व द्वितीय क्रमांक रोहिणी राजेंद्र होवाळ आणि तृतीय क्रमांक वैष्णवी नंदकुमार खांडेकर डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला यांनी पटकावला आहे. तसेच १ ली ते ४ थी गटातून प्रथम क्रमांक कु. काव्या श्रीकांत साळे विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला, द्वितीय क्रमांक कु. आराध्या अनिल गोडसे जि.प.प्रा.शाळा गोडसेवाडी व तृतीय क्रमांक अवधूत राजेंद्र मोटे यशराज प्राथमिक शाळा घेरडी व उत्तेजनार्थ कृष्णा सुभाष लवटे फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला यांनी पटकावला आहे.
५ वी ते ७ वी गटातून प्रथम क्रमांक कु. संस्कृती भाग्यवंत बेहेरे सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला, द्वितीय क्रमांक कु. साक्षी राहुल झेंडे छ.शिवाजी विद्यामंदिर धायटी, तृतीय क्रमांक कु. विक्रांती विक्रम पवार महात्मा फुले विद्यालय, डोंगरगाव व उत्तेजनार्थ बक्षिस कु. ईश्वरी अशोक गायकवाड फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला यांनी पटकवला आहे. ८ वी ते १० वी गटातून प्रथम क्रमांक कु. समृद्धी विष्णू माळी न्यू इंग्लिश स्कूल सांगोला, द्वितीय क्रमांक कु. स्नेहल विलास जानकर उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला, तृतीय क्रमांक कु. प्रणिती राजेंद्र पवार पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल य. मंगेवाडी व उत्तेजनार्थ बक्षीस कु. सृष्टी हेमंत जाधव यांनी पटकावला आहे. सदर स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख व संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य बबनराव जानकर, प्रा. अशोकराव शिंदे, प्रा. दीपक खटकाळे, प्रा. जयंत जानकर व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य प्रा. केशव माने सर व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य श्री. दिनेश शिंदे सर, उद्योगपती मा. बाळासाहेब एरंडे (मालक), युवा नेते उल्हास धायगुडे, प्रशांत वलेकर, पोपट गडदे सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक