सांगोला (प्रतिनिधी): वाघमारे सरांच्या कराटे क्लासेस शोतोकान स्पोर्ट्स कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्यामार्फत लिटिल मिलेनियम प्रीस्कूल सांगोला येथे दिनांक 28 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत एकूण पाच मुलांचे यश संपादन केले.

यामध्ये विरेन इंगोले, श्रीहरी देशपांडे, आयुष्मान मोरे, प्रणव लांडगे, शौर्य लांडगे यांनी ब्लॅकबेल्ट परीक्षेमध्ये यश संपादन केले. तर गोल्डन ब्राऊन गटामध्ये अनुष्का वाघमारे व सोहम कदम यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना श्री सुनील वाघमारे सरांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेचे कामकाज श्रावणी वाघमारे, मयंक स्वामी,निजेंद्र चौधरी, आशिष कोकरे यांनी पाहिले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



