सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण थाटामाटात व उत्साहात संपन्न झाले.
बुधवार दि. १ जानेवारी रोजी सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका खास समारंभात आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात आले.
यावर्षी डॉ. महादेव संभाजी गायकवाड ( लोणविरे ) यांना सृजनशील शेतकरी पुरस्कार, विजय रामचंद्र चव्हाण सांगलीकर (सांगोला ) यांना समाजसेवा प्रेरणा पुरस्कार, श्रीमती साधना श्रीगणेश कुलकर्णी (सांगोला ) यांना कृतिशील आदर्श माता पुरस्कार, श्रीमती जानकाबाई दिगंबर चंदनशिवे ( अजनाळे ) यांना सार्थ स्वाभिमान पुरस्कार, तर वाढेगाव येथील मांगणगा भ्रमणसेवा बहूउद्देशीय संस्था यांना आदर्श संस्था पुरस्कार आपुलकीच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आपुलकीच्या सहभागी सदस्यांनी कराओके गीत, वैयक्तिक नृत्य, बौद्धिक खेळ सादर केले. त्यानंतर पुरस्कार वितरण व आपुलकी सदस्यांच्या विविध निवडी, यश याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी सांगोला येथील ज्येष्ठ नागरिक व परीट समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव जाधव यांनी आपल्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला २ हजार ८६ रुपयाची देणगी दिली. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपुलकीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक