श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय,आटपाडी येथील इयत्ता बारावी कला शाखेतील विद्यार्थिनी कु. आरती संतोष काळे हिची औरंगाबाद क्रीडा प्रबोधिनी येथे चालणे (वॉकिंग) या क्रीडा प्रकारात निवड झाली आहे. हा आटपाडी परिसरासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आरतीने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि मार्गदर्शकांच्या मदतीने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून क्रीडा प्रबोधिनीच्या निवडीसाठी पात्र झाली आहे. तिच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गौरव चव्हाण क्रीडा शिक्षक हनुमंत माने यांचे मार्गदर्शन लाभले. आरतीच्या या यशामुळे भविष्यात ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या परिसराचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दि.आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख संस्थेचे सचिव मा. श्री एच. यू. पवार निरीक्षक मा. श्री ए. के. गायकवाड श्री पी. जी. नामदास श्री अशोक चौगुले महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका व प्रशासकीय सेवक यांनी कु. आरती काळे हिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक