अजनाळे (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी इयत्तेच्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्तायादी नुकतीच जाहीर झालेली असून अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून अभिनवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या परीक्षेत इयत्ता ५वी तील आरुष शिवाजी लाडे याने ग्रामीण सर्वसाधारण गटात ११५ वा क्रमांक मिळवून गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावले. तसेच इयत्ता ८वी तील अनिकेत अर्जुन कोळवले याने ९८ वा क्रमांक तर अभय गणेश खळगे याने २०३ वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम यांचे नेतृत्व, तसेच काजल कोळवले, सीमा कदम, वंदना शिंदे आणि सदाशिव जावीर या शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले.
या उल्लेखनीय यशामुळे अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे या ग्रामीण भागातील शाळेने आपली गुणवत्ता आणि शैक्षणिक कामगिरी सिद्ध करत इयत्ता पहिलीपासूनच घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपली कामगिरी नेहमीच यशस्वी आणि समाधानकारक असल्याचे दाखवून दिले. सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक