चिमुकल्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने…
अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे चे वार्षिक स्नेहसंमेलन ‘अभिनव फेस्टिवल’ अत्यंत जल्लोषपूर्ण आणि नयनरम्य वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन सुप्रसिद्ध डॉ. शिवाजीराव ढोबळे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय दादा येलपले, अजनाळे गावच्या सरपंच अनिता पवार, उपसरपंच दत्तात्रय कोळवले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग कुरे,मा. सरपंच विष्णू देशमुख ,मा. सरपंच चंद्रकांत कोळवले, प्रा. श्रीनिवास येलपले, चंद्रकांत पवार, राजाराम गुरव, धर्मराज लाडे ,पत्रकार सचिन धांडोरे, विठ्ठल विभुते (पोलीस) प्रकाश विभुते, अशोक चौगुले, प्रा.शिवाजी विभुते, प्रा.राजाभाऊ कोळवले,बदडे सर, डॉ.संतोष वलगे, सागर सरगर, हनुमंत चव्हाण ,सचिन पवार, रामचंद्र गाडेकर ,पत्रकार नंदकुमार विभुते,पांडुरंग लाडे दत्तात्रेय विभुते सारंग गिड्डे ( लाईटकोड सॉफ्टवेअर ) संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे व मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणरायाला वंदन करून गणेश वंदना या गीताने झाली. या कार्यक्रमांमध्ये मुलांनी आपले उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध हिंदी मराठी गीत,मोबाईल थीम,देशभक्तीपर गीत,गोंधळ गीत, साउथ इंडियन गीत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कलाकृती सादर केल्या.यामध्ये खास आकर्षण ठरलेले वाघ्या मुरळी नृत्य, धनगरी नृत्य, तानाजी थीम आणि विठ्ठल थीम अशा नृत्याविष्कार ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रमुख पाहुणे तसेच शाळेचे संपूर्ण व्यवस्थापक मंडळ यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच अग्रेसर राहील वेगवेगळ्या स्तरांवरती मुलांच्या कौशल्याला आपण नक्कीच प्रोत्साहन देवू असे मतही या ठिकाणी व्यक्त केले.
यावेळी रंगोत्सव स्पर्धेमधील तसेच शै. वर्ष 2024 -25 मधील आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पुरस्कार वितरित करण्यात आले. रंगोत्सव स्पर्धेमध्ये रोशन संतोष कोळवले याने द्वितीय क्रमांक मिळवला तर आर्यन अमोल चौगुले यांने आर्ट मेरिट अवॉर्ड पटकावला. माध्यमिक विभागातून तेजस जगन लाडे हा आदर्श विद्यार्थी तर समीक्षा दत्तात्रय खंडागळे आदर्श विद्यार्थिनी आणि प्राथमिक विभागातून प्रणव प्रकाश विभुते हा आदर्श विद्यार्थी तर स्वराली रोहित बनकर ही आदर्श विद्यार्थिनी पुरस्काराची मानकरी ठरली. सदर कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल त्यांनी अभिनव टीमचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे,रवींद्र भारती व सीमा कदम यांनी केले. संस्थाध्यक्ष लाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना शिंदे,काजल कोळवले,अर्चना खुळपे आदी विभाग प्रमुखांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.उत्साही वातावरणामध्ये व शिस्तबद्ध पद्धतीने या कार्यक्रम संपन्न झाला.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक