सांगोला (प्रतिनिधी): आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड मानसिंह उदयसिंह जहागीरदार यांचे सुपुत्र ॲड तेजसिंह जहागिरदार यांची भारत सरकारच्या सक्त वसुली संचालनालयाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेतून महाराष्ट्रातून उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांनी ॲड तेजसिंह जहागीरदार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने सचिव निलकंठ शिंदे सर, बापूसाहेब देशमुख, सहसचिव विठ्ठलपंत शिंदे सर, सुमित देशमुख यांनी ॲड मानसिंह जहागीरदार यांचा देखील सन्मान केला. यावेळी संस्थेच्या संचालक मंडळांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

भारत सरकारच्या महत्त्वाच्या सक्त वसुली संचालनायलात (इडि)कायदेशीर सल्लागार पदावर निवडीमध्ये आई-वडिलांचे मार्गदर्शन, अथक परिश्रम व संस्थेचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी जहागिरदार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. विशेषतःसोलापूर जिल्ह्यात त्यांचे निवडीबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



