सांगोला:- ग्रामदैवत अंबिकादेवी यात्रेस गुरुवार दि. 30 जानेवारीपासून प्रारंभ होणार असून मंगळवार दि. 28 जानेवारी व बुधवार दि. 29 जानेवारी रोजी जागा वाटप सकाळी 11.30 ते 2 व दुपारी 4 ते 6 यावेळेत करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी आकर्षक दारुकामाने सांगोला यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रा कालावधीत नेहमीप्रमाणे शेती विषयक प्रदर्शन, विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा, जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम व शोभेचे दारुकाम आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
यंदा यात्रेत दुकानदारांची, व्यावसायिकांची रेलचेल असणार आहे. त्याचप्रमाणे पाळणे, खेळण्याची दुकाने, मिठाई, जिलेबी दुकाने, गृहउपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची साधने, शेतीची औजारे आदी विक्री करणारे लहान-मोठे व्यावसायिक मोठ्या संख्येने येणार आहे. मा. जिल्हा न्यायाधिश साो, पंढरपूर यांनी दि. 24 जानेवारी रोजी अंबिकादेवी यात्रेचे कामकाज पाहण्यासाठी कोर्ट रिसीव्हर म्हणून सहाय्यक सरकारी वकील, अॅड. श्री. विक्रांत प्रकाश बनकर, अॅड. श्री. विशालदीप विजयसिंह बाबर, अॅड. श्री. नितीन गुलाबराव बाबर, अॅड. सौ. शशिकला सुधीर खाडे, अॅड. श्री. महेंद्र मारुती पत्की यांची नेमणूक केली आहे.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यात्रा भरणार असून रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर सहाय्यक सरकारी वकील, अॅड. श्री. विक्रांत प्रकाश बनकर (मो.9307955455), अॅड. श्री. विशालदीप विजयसिंह बाबर (मो.9822273480,), अॅड. श्री. नितीन गुलाबराव बाबर (मो. 9405437822), अॅड. सौ. शशिकला सुधीर खाडे (मो. 8552815599), अॅड. श्री. महेंद्र मारुती पत्की (मो.9403938794) यांनी दिली.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक