सांगोला (प्रतिनिधी): सामाजिक , शैक्षणिक,ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अमोगसिध्द कोळी गुरुजी यांचा नगरवाचन मंदिर सांगोला येथे त्यांची जिल्हा शिक्षक समितीच्या अध्यक्षपदावर निवड झालेबद्दल

सांगोला तालुका ग्रंथालय संघ व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांचे वतीने तालुका संघाचे संस्थापक, राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांचे हस्ते शाल पुष्पहार ग्रंथभेट देऊन सह्दयी सन्मान करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन कोळी गुरुजीना शुभेच्छा दिल्या. तसेच रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचा राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार मिळालेबद्दल ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचा ही सन्मान करणेत आला.यावेळी सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हरिदास घोडके,

कार्याध्यक्ष मच्छिंद्र मिसाळ ,दत्ताञय पाटील ,अशोक सावंत ,नगर वाचन मंदीर चे ग्रंथपाल रणजित भंडारे , शिक्षक जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा नेते साईनाथ नायवाड उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूञसंचालन आभार संघाचे कर्तव्यदक्ष सचिव अशोक व्हटे यांनी पार पाडले.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



