संघटन कौशल्या च्या जोरावर तसेच शिक्षकांसाठी काम करण्याची धडपड व पाठपुरावा करून काम यशस्वी करण्याच्या प्रयत्नामुळेच अमोगसिद्ध कोळी गुरुजी हे शिक्षक समिती च्या जिल्हा अध्यक्षपदी विराजमान-शंभू माने

प्रतिनिधी (शशिकांत कोळी):- सांगोला तालुक्यातील घेरडी गावचे आमोगसिद्ध कोळी गुरुजी यांची सांगोला तालुक्याला व कोळी समाज्याला पहिल्यांदा च शिक्षक समिती जिल्हाअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सांगोला तालुका कोळी समाज्याच्या वतीने शाल पुष्प गुच्छ व फेटा बांधून सत्कार सांगोला तालुका शिक्षक सोसायटी येचे सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी शंभु माने कोळी महासंघाचे नेते, विष्णु कोळी गुरुजी,प्रा खानापुरे, विकास ननवरे, सुनील कोळी गुरुजी, चिवळ्या कोळी, ऱा. घ. कोळी गुरुजी, दत्ता कांबळे गुरुजी, सिद्धांना कोळी गुरुजी, नागन्नाथ कोळी, अरुण कोळी तसेच सांगोला तालुक्यातील कोळी समाज बहू संख्येने उवस्थित होते.

सांगोला तालुका शिक्षक समिती च्या जिल्हाअध्यक्ष पदी माझी निवड म्हणजे संघटनेने दाखविलेला विश्वास तसेच सांगोला तालुक्यातील शिक्षकांनी एकजुटीने दिलेला पाठींबा त्यामुळेच मला हे पद मिळू शकले.

महत्वाचे म्हणजे सांगोला कोळी समाज्याच्या वतीने केलेला सत्कार म्हणजे घरचा सत्कार आणि म्हणून मी ही माझ्या समाज्यासाठी देणे लागतो निश्चित च समाज्या साठी पण ज्या ज्या वेळेस माझी गरज भासेल त्या त्या वेळी मी माझा वेळ देईन व शिक्षकांसाठी आणखी प्रयत्नशील राहीन त्याच बरोबर मी जरी जिल्हा अध्यक्ष झालो तरी माझ्या रूपाने हे सर्व शिक्षक जिल्हा अध्यक्षच असतील
-अमोगसिद्ध कोळी गुरुजी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



