माढा:- रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथे वार्षिक पारितोषिक समारंभ नुकताच संपन्न झाला. महावि महाविद्यालयातील एन. एस. एस., एन.सी.सी., सांस्कृतिक व जिमखाना विभागातील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा येथील सुप्रसिद्ध कवी मा. इंद्रजीत घुले उपस्थित होते व कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी चे सदस्य प्रा. नानासाहेब लिगाडे हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये माढ्याचे आदर्श शिक्षक मा. डी. व्ही. चवरे होते.
याप्रसंगी कवी इंद्रजीत घुले यांनी आपल्या कविता व व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थीदशे मध्ये कष्ट घेतल्यानंतर आयुष्य सुखकर होते असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. अशोक लोंढे यांनी करून दिला.
तसेच कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष डॉ. दत्तात्रय काळेल यांनी अहवाल वाचन केले व आभार जिमखाना प्रमुख डॉ. पंकज ढमाळ यांनी मानले,तर सूत्रसंचालन डॉ. नामदेव शिंदे व डॉ. अलका घोडके यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक