सांगोला तालुक्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जवळजवळ सात हजार ते आठ हजार घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यातील जवळजवळ सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये रक्कम घर बांधण्यासाठी जमा करण्यात आलेले आहेत. परंतु, घर बांधण्यासाठी वाळू उपलब्ध नाही त्यामुळे जी वाळू चोरून विकली जाते ,ती एक ब्रासला दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये आकारणी करत आहेत. त्यामुळे घरकुलासाठी मिळालेले अनुदान हे फक्त वाळूसाठीच जाईल अशी परिस्थिती आहे .त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना घरकुलाचा लाभ देण्यामागील उद्देश साध्य होताना दिसत नाही.
तरी महाराष्ट्र जमीन महसूल( गौण खनिजांचे उत्खनन व ते काढणे)( दुसरी सुधारणा) नियम 2018 नुसार ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता असलेल्या शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या व्यक्तीस या नियमाच्या तरतुदीच्या अधिनतेने तहसीलदारांची लेखी परवानगी घेऊन जिल्हाधिकारी यांनी वाळु उत्खननासाठी पर्यावरण अनुमती घेऊन लिलावासाठी निश्चित केलेल्या मात्र यशस्वीरित्या बोली न लागलेल्या वाळू घाटांपैकी या प्रयोजनासाठी निश्चित केलेल्या वाळू घाटातून कोणतीही फी किंवा स्वामित्व धन न आकारता स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी पाच ब्रास पेक्षा अधिक नाही एवढी वाळू काढण्यास परवानगी देण्यात यावी . अशी मागणी बहुजन समाज पार्टी सांगोला यांनी केली आहे.
लाभार्थ्यांनी अशी मागणी साठी अर्ज केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी लेखी परवानगी पंधरा दिवसाच्या कालावधीच्या आत देण्यात यावी. अन्यथा बहुजन समाज पार्टी जोपर्यंत लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची वाळू मिळणार नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा देत आहे. तरी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत हा लाभ मिळावा यासाठी संबंधित तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी साहेब, व सर्व ग्रामपंचायत यांनी आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी ,असे निवेदन दिले.त्याचबरोबर लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची वाळू मोफत मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पार्टी व सर्व कार्यकर्ते कायम कटिबद्ध राहतील असे आश्वासन लाभार्थ्यांना दिले व त्याच बरोबर या लाभ देण्याच्या लढाईत लोकांनी ही अर्ज करून या हक्काच्या लढाईत सामील होण्याचे आव्हान केले
यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी मिलिंद बनसोडे ,जिल्हा सचिव कुंदन बनसोडे ,सांगोला तालुका युवा अध्यक्ष बाळासाहेब गडहिरे ,तालुका महासचिव अजय ठोकळे ,बहुजन समाज पार्टीचे सदस्य कुबेर मंडले, कोंडीबा वायदंडे, प्रशांत चंदनशिवे, सुहास बनसोडे, अमोल बनसोडे ,राजू माने,किरण बनसोडे ,साई बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक