सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोपसेवाडी येथे पहिली ते चौथीच्या व अंगणवाडी मुलांचा बाल आनंद बाजार व फूड फेस्टिवल संपन्न झाला .या कार्यक्रमाचे उद्घाटन जवळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुहास कुलकर्णी गुरुजी, भोपसेवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पोळ सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धुळा बोरकर, भोपसेवाडी चे माजी डेप्युटी सरपंच कोरे,श्री व्हटे सर, शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्ष कोरे ताई, अंगणवाडीच्या वगैरे ताई , नरळे मामा,सागर हाके,विठोबा करांडे,भगवान कोळेकर,सर्व पालक,शाळा व्यवस्थापन सदस्य यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून बाजाराचे उद्घाटन झाले.

उद्घाटन प्रसंगी भोपसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री पोळ सर यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व मुलांना आजच्या युगामध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाचाही अतिशय उपयोगी आहे. असा उपक्रम घेतल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक यांचे अभिनंदन केले तसेच सुहास कुलकर्णी गुरुजी यांनी बाजारात शुभेच्छा देताना एक आदर्शवत शाळा म्हणून भोपसेवाडी आज नावारूपास येत आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. बाजार म्हणजे काय असते? त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण कशी होते, तसेच वस्तू किती रुपयाला, पैसे माघारी किती द्यायचे, आपल्याकडे किती घ्यायचे याचे प्रत्यक्ष अनुभव दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले व बाजारात शुभेच्छा दिल्या.

या बाजारामध्ये सर्व मुलांनी आपल्या परिसरातील भाज्या, फळे, तसेच विविध वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. काही मुलांनी खाऊचे साहित्य भेळ ,पाणीपुरी, मठ्ठा, चॉकलेट, राजगिरा लाडू, शेंगदाण्याची लाडू, रव्याचे लाडू ,चक्की ,बर्फी असे विविध पदार्थ बाजारात आणून विक्रीसाठी मांडले.बाजारासाठी मोहिते वस्ती शाळेतील सर्व विध्यार्थी व शिक्षक आले त्यांनी बाजाराचा आनंद घेतला.त्यांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. या बाजारातून मुलांना जवळजवळ 12379 रुपयांची विक्री झाली या बाजारासाठी भोपसेवाडी शाळेतील सर्व पालकांनी परिश्रम घेतले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य तसेच सर्व शाळेतील माता पालक, परिसरातील सर्व पालक, शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, अंगणवाडी ताई यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.कार्यक्रमास विस्तार अधिकारी श्री भंडारी साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री नवले साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


