सोनंद (प्रतिनिधी ): शासन निर्णयानुसार आता माध्यमिक शाळेमध्ये इको क्लब निर्मिती करणे सक्तीचे आहे इको क्लब अंतर्गत विद्यार्थ्यांना झाडे लावण्यास प्रोत्साहन करणे पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण करणे, जागरूकता वाढविणे, निसर्गा विषयी प्रेम निर्माण करणे यासाठी वेगवेगळ्या अनोख्या कृती विद्यार्थ्यांना देणे क्रमप्राप्त असते.
तर या साठी प्रशालेच्या प्राचार्य श्रीमती संगीता शेडसाळे यांनी इयत्ता सातवीतील मुलांना समुपदेशन केले सात मुलांनी दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण करण्यासाठी चक्क 47 रोपे आणली त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून व पुढे या रोपांच्या संगोपनासाठी त्यांनी फॉलोअप घ्यावा म्हणून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या व पेन वाटप ही केले ज्येष्ठ शिक्षक सी तांबोळी सर हे उपस्थित होते ही सर्व रोपे प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने सोनंद येथील स्मशानभूमी मध्ये लावण्यात आली शासन निर्णय प्रमाणे दोन ऑगस्ट रोजी सामुदायिक जागी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम पार पाडला.
प्रशालेतील शिक्षकांनी मुलांना स्मशानभूमीत नेऊन वृक्षारोपण केले. केंद्रप्रमुख श्री तानाजी साळे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. सोनंद केंद्रामधील सर्व शाळां मध्ये अधिक वृक्ष सावित्रीबाई फुले प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एक पेड मा के नाम अंतर्गत लावले. सर्व मुलांनी लावलेल्या झाडाची काळजी घ्यावी ती मोठी करावीत असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक