सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले , पंडीत जवाहरलाल नेहरू या थोर महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी मा.बाधकाम सभापती सतिश भाऊ सावंत यांनी केली आहे या महापुरुषांच्या आजू बाजूला लागणारी वाहने तसेच बाजुला लागणाऱ्या हातगाडे लावू देऊ नये सांगोला तालुक्यात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात कोणत्याही महापुरुषांच्या पुटळ्याची विटंबना होऊ नये.या साठी सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे तसेच सांगोला तालुक्यात व शहरात चोऱ्या मारा माऱ्या या घटनांचे प्रमाण वाढले असुन वर्दळीच्या ठिकाणी चोरटे चोरी करू लागल्याने पोलिसांपुढे चोरीच्या घटना वर आळा घालण्याचे आव्हान निर्माण झाले आहे तरी प्रशासनाने सांगोला शहरातून जाणाऱ्या हायवे पुलाखाली सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी सतिश भाऊ सावंत यांनी केली आहे.
गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे सांगोला शहरात व तालुक्यात चोरीच्या घटनेने डोके वर काढले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये व्यापारी वर्गामध्ये भीती वाढली आहे.
तरी संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सांगोला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यासह सांगोला शहरातून जाणाऱ्या सर्व हायवेच्या पुलाखाली सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे तसेच सांगोला शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यापाशी ही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक