सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर सांगोला येथे दिनांक 26 जानेवारी रोजी 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाजसेवक बापूसाहेब ठोकळे यांनी केले.

महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहर अर्पण आयु. गोदाबाई बनसोडे नगरसेविका व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली शेळके मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

देशभक्ती गीतावर विद्यार्थ्यांचे सामूहिक कवायत घेण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.. शालेय उपक्रम चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, वेशभूषा, सांस्कृतिक इत्यादी उपक्रमामध्ये उत्कृष्ट सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयु.स्नेहल लोखंडे यांचे कडून ट्रॉफी व आयु.सुभाष जगधने यांचे कडून प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तदनंतर विद्यार्थी भाषणे घेण्यात आली. माजी नगरसेविका विजयाताई बनसोडे यांनी शाळेचीं रंगरंगोटी व भौतिक सुविधा प्रतिष्ठित नागरिक व पालक यांच्या सहकार्याने पूर्ण करूया असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच सुभाष जगधने माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष यांनीही शाळेच्या विकास कामात योगदान देण्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगोला यांचे कडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र विषयी पुस्तके शाळेत विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली. अंगणवाडी मदतनीस लक्ष्मी बनसोडे यांनी बालविवाह प्रतिबंध कायदा प्रतिज्ञाचे वाचन केले या कार्यक्रमाच्या वेळी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास बनसोडे वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय कांबळे अविकांत चंदनशिवे सर, मोहन गुडदौरू सर समाधान गडहिरे सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जया बनसोडे,कोमल ठोकळे, मंजुषा बनसोडे जयंती बनसोडे तसेच सन्माननीय सर्व प्रतिष्ठित नागरिक, पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे शेवटी शाळेच्या सहशिक्षिका मैना गायकवाड मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



