केंद्रस्तरीय टॅलेंट हंट स्पर्धा दिघेवाडी (वाढेगाव) येथे उत्साहात संपन्न*

0

वाढेगाव केंद्राच्या टॅलेंट हंट स्पर्धा जि.प. प्रा. शाळा दिघेवाडी येथे मंगळवार दि.८ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.प्रविण राजाराम हजारे, केंद्रप्रमुख श्री. मठपती मल्लय्या साहेब व मुख्याध्यापक श्री. मोरे सर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी वाढेगाव केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक उपस्थित होते. टॅलेंट हंट स्पर्धेत लहान व मोठ्या गटात कथाकथन,निबंध, चित्रकला, वक्तृत्व, समुहगीत गायन, लोकनृत्य या स्पर्धांचा समावेश होता.

दिवसभराचे वेळापत्रकानुसार सर्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
लहान गट

कथाकथन स्पर्धा
प्रथम क्रमांक-अथर्व प्रवीण दिघे शाळा -दिघेवाडी.
द्वितीय क्रमांक-आर्या कल्याण बर्गे शाळा- मेटकरी वस्ती (सावे)

निबंध स्पर्धा
प्रथम क्रमांक- जानवी समाधान अडसूळ शाळा अडसूळमळा (वाढेगाव)
द्वितीय क्रमांक-ऋषिकेश सचिन इंगवले शाळा इंगवले बाबने मळा

चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक-ईश्वरी संभाजी दिघे-शाळा इंगवले बाबने मळा
द्वितीय क्रमांक-सोहम विकास इमडे शाळा सावे

वक्तृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक-अथर्व प्रवीण दिघे शाळा दिघेवाडी
द्वितीय क्रमांक-समर्थ योगेश तोडकरी शाळा तोडकरवस्ती

समूहगीत गायन स्पर्धा-
प्रथम क्रमांक -जि .प. प्रा. शाळा -दिघेवाडी

समूह लोकनृत्य स्पर्धा-
प्रथम क्रमांक -जि. प. प्रा .शाळा मेटकरीवस्ती (सावे)

मोठा गट

इयत्ता ६ वी ते ७ वी
कथाकथन स्पर्धा-प्रथम क्रमांक-प्रज्योती प्रवीण दिघे
शाळा -दिघेवाडी
द्वितीय क्रमांक-अंकिता हरिदास स्वामी शाळा-सावे

निबंध स्पर्धा
प्रथम क्रमांक – कु.चंदना भारत वसमळे -शाळा दिघेवाडी
द्वितीय क्रमांक-ज्ञानेश्वर हरिदास बंडगर शाळा – सावे

चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक -रोहित नामदेव जाधव शाळा -सावे
द्वितीय क्रमांक -शंतनु सदानंद वसमळे शाळा दिघेवाडी

समूहगीत गायन स्पर्धा
प्रथम क्रमांक-जि. प. प्रा शाळा दिघेवाडी

समूह लोकनृत्य स्पर्धा
प्रथम क्रमांक-जि प प्रा शाळा दिघेवाडी

या सर्व विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here