छ. शिवाजीराजे सार्व.वाचनालय घेरडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): छ. शिवाजीराजे सार्व. वाचनालयामध्ये विविध कार्यक्रम व जयंती उत्सव साजरी केली जातात. त्याचप्रमाणे 14 एप्रिल 2025 रोजी वाचनालय मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण घेरडी गावच्या विदयमान सरपंच धुरपाबाई देवकते व ग्रामपंचायत सदस्या श्रावणी जगधने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धम वंदना घेण्यात आली.

यावेळी प्राथमिक शिक्षक संतोष घुटुकडे, परमेश्वर गेजगे, यशराज प्राथमिक प्रशालेचे शिक्षक अविनाश लांडगे, माजी सरपंच दिलीप मोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती व महापुरुषांच्या जयंती का साजरी करायची याबाबत अनेक उदाहरणे देऊन आपले अनमोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेरडी चे शिक्षक भजनाळे यांनी स्वलिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गीत गायले व समाज प्रबोधन केले. त्यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष अमोगसिद्ध कोळी यांनी वाचनालयाची माहिती व उपस्थितांना वाचनालयाच्या अडीअडचणी सांगितल्या व वाचनालयाचे वाचक वार्षिक सभासद होण्यासाठी विनंती केली.

या जयंतीप्रसंगी घेरडी गावच्या विदयमान सरपंच धुरपाबाई देवकते, ग्रामपंचायत सदस्या श्रावणी जगधने माजी पंचायत समिती उपसभापती तानाजी चंदनशिवे माजी सरपंच दिलीप मोटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य आबा मोटे, सीबीएस न्यूज मराठीचे संपादक चांद शेख, पत्रकार सचिन चंदनशिवे, माजी सरपंच शंकर जगधने माजी सरपंच प्रतिनिधी बयाजी लवटे,ग्रामपंचायत सदस्य अविनाश जगधने युवा उद्योजक व समाजसेवक धर्मेंद्र(पप्पू) कांबळे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर गेजगे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक घेरडी भजनावळे, शेजाळ, प्राथमिक शिक्षक संतोष घुटुकडे, यशराज प्राथमिक प्रशालेचे शिक्षक अविनाश लांडगे,छ. शिवाजीराजे सार्व. वाचनालय घेरडी अध्यक्ष अमोगसिद्ध कोळी, कार्यवाहक व माजी सरपंच तुकाराम औताडे,सुरेश देवकते, पोपट जगधने (मिस्त्री), काटे, भिम सैनिक, वाचक वर्ग व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल शशिकांत कोळी यांनी केले तर आभार कार्यवाहक तुकाराम औताडे यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here