सांगोला(प्रतिनिधी) सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांनी तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचत सर्जनशीलतेसाठी परिवर्तनाची हाक दिली आहे. गेली दहा दिवस सातत्याने असंख्य मतदारांपर्यंत पोहचत आधुनिकतेचा अजेंडा त्यांनी लोकांपर्यंत पोहचवला आहे. त्याचबरोबर काल झालेल्या विराट पदयात्रेच्या व जाहीर सभेच्या माध्यमातून जनतेला आता ठाम विश्वास वाटू लागला आहे की यंदाच्या निवडणुकीत नगरपालिकेत विश्वेश झपके यांच्या रूपाने परिवर्तन अटळ ठरणार आहे.

सर्वांना सोबत घेऊन सर्व समावेशक विकासासाठी झपके सर शिवाय पर्याय नाही
विकास सर्वांनाच हवा आहे परंतु सर्वसमावेशक व सर्वांना सोबत घेऊन जाणारे तालुक्यातील एकमेव प्रभावी व्यक्तित्व प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर कायम पाठीशी उभे आहेत.त्यामुळे या पुढील काळातही तालुक्यामध्ये विश्वेश झपके यांच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन परिपूर्ण विकास होईल ..
सांगोला नगरीचा पूर्व इतिहास आपणा सर्वांना माहित आहे झपके सरांनी सांगोला नगरीचा विकास साधत असताना सर्व गट तट बाजूला ठेवून केवळ सर्वसामान्य व जनतेच्या विकासासाठी त्यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल असेल किंवा नगरसेवक म्हणून कार्यकाळ हा पूर्ण केला आहे. त्यामुळे असे प्रभावी व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने निश्चितपणे आधुनिकतेचा पाऊल उचलेल यात शंका नाही.

विचाराला कृतीची जोड
विश्वेश झपके यांनाच निवडून का द्यायचे याबाबत जनतेने केलेला विचार तितकाच महत्वपूर्ण आहे. अपूर्ण काम त्याचबरोबर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरलेले लोकप्रतिनिधी या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी विचार आणि प्रत्यक्ष कृती करणारे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांनाच निवडून देण्याचा संकल्प सांगोला नगरीच्या लोकांनी केला आहे. लोकांना परिवर्तन हवे आहे त्या परिवर्तनाच्या माध्यमातूनच आधुनिक विकासाचा पाया अपक्ष उमेदवार विश्वेश झपके घालू शकतील हे नक्की आहे.
सर्जनशील व आधुनिकतेची सांगड घालणारा उमेदवार म्हणून इंजिनियर विश्वेश झपके यांच्याकडे पाहिले जात आहे. विकास म्हणजे केवळ रस्ते पाणी वीज या गोष्टी नव्हेत तर विकास म्हणजे लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देणे लोकांची मूलभूत प्रश्न समजावून घेणं आणि आधुनिकतेची सांगड घालत त्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण याला विकास म्हणतात या पुढील काळात निश्चितपणे आधुनिकतेची सांगड घालून उज्वल विकासाची दिशा ठरली जाणार आहे.

विधायक व्यवस्थापनेतून विविध संस्थांचे आदर्श कार्य
आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, साहित्यिक कार्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात झपके घराण्याचे नाव अभिमानाने घेतले जाते. शहराच्या समस्यांना समजून घेणारे,लोकांची समस्या आपली समस्या समजून ती पूर्णत्वास आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या झपके घराण्याची समृद्ध परंपरा खूप महत्वपूर्ण आहे
विराट पदयात्रेचे विराट जाहीर सभेत रुपांतर…
ग्रामदैवत अंबिका देवीच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ वाढवून विराट पदयात्रेला सुरुवात झाली ही पदयात्रा कचेरी रोड-आण्णाभाउ साठे पुतळा,भिमनगर-वाडेगाव नाका- खडतरे गल्ली- कोष्टी गल्ली-मुजावर गल्ली-बी.एस.एन. एल ऑफीस -भोपळे रोड-महात्मा फुले चौक-स्टेशन रोड – अशा मार्गाने संपन्न झाली. विविध ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके यांना मतदारांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. विराट पदयात्रेचे शिवाजी चौक येथे आल्यानंतर विराट सभेमध्ये रूपांतर झाले.
*शाश्वत विकासासाठी सर्जनशील व्यक्तित्वाला विजयी करा*
स्वच्छ व सुंदर शहर, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी सुसज्ज बगीचा, क्रीडा संकुलातील सुविधा, अंतर्गत गटारी व मोकळा श्वास घेता येण्याजोगे पक्के रस्ते, आरोग्याच्या दृष्टीने लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा, अतिक्रमण व धुळमुक्त शहर, महापुरुषांच्या पुतळ्या सभोवतालची स्वच्छता, दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था उत्तम दर्जाची मिळावी, या सांगोला शहरातील नागरिकांच्या अपेक्षा आहेत.
याच्या पूर्णत्वासाठी एअर कंडिशनर या चिन्हासमोरील बटन दाबून सर्जनशील व्यक्तित्व विश्वेश झपके यांना प्रचंड मतांनी विजयी करा
मला संधी द्या..
माझी लढाई विकासासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील तुमच्या समस्या निश्चितपणे सोडवल्या जातील.. दर महिन्याला प्रत्येक प्रभागात एक आम सभा होईल त्या माध्यमातून त्या प्रभागाच्या समस्यांचा निपटारा केला जाईल. नागरिकांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही याची मी ग्वाही देतो.. माझ्या सर्वात मोठे बळ तुम्ही सर्व नागरिक आहात मी अकरा प्रभागातून प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचलो आहे. मी तुमच्यातलाच एक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून सांगोल्याचे गतवैभव परत आणू या. सांगोल्याच्या विकासासाठी एक मत द्या. माझ्यासाठी देऊ नका. स्वतःच्या विकासासाठी द्या. मला एक संधी द्या त्या संधीच्या माध्यमातून सांगोल्याचा शाश्वत विकास मी करेल यात शंका नाही.
विश्वेश झपके
नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार
उघडा डोळे बघा नीट…
विचारांचा वारसा काय असतो हे आता तुम्ही अनुभवलं.. विश्वेश या सभेत बोलला आणि त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला नगरपालिकेचे व्हिजन लक्षात आले असेल.शिक्षणाचा वारसा काय असतो आणि विचारांचा वारसा काय असतो ते तुम्हाला समजले असेल.
मी वस्तुस्थिती मांडतोय लबाड आणि खोटं बोलत नाही तसं असतं तर मी यापूर्वीच आमदार झालो असतो. चाळीस वर्षे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष माझा नगरपालिकेच्या राजकारणाशी संबंध राहिला आहे. नगरपालिकेच्या स्थापनेपासून झालेल्या निवडणुकींचा अभ्यास केला तर २०२५ ची निवडणूक ही अत्यंत वेगळी आहे. पुरोगामी विचार जपणाऱ्या कै.गणपतरावजी देशमुख यांची आठवण ही निवडणूक पाहताना होते. शहराची निवडणूक कोणी लढवावी ही बाब गणपतराव देशमुख असेपर्यंत शहरातल्या लोकांनी ठरवले मात्र त्यांच्यानंतर बाहेरच्या लोकांनी निवडणूक कोणी लढवावी हे ठरवले जाते तेव्हा निश्चितच वेगळी आहे.आजच्या नेत्यांबद्दल फक्त विचार करून बघा गणपतराव देशमुख यांच्या पश्चात सांगोल्याच्या राजकारणाची दिशा कशी बदलली आहे हे तुमच्या लक्षात येईल. मी शहाजी बापू पाटील,दीपक आबा साळुंखे पाटील यांना सातत्याने विविध निवडणुकीच्या माध्यमातून मदत केली आहे, खरंतर माझ्या मुलाच्या वेळी ते मला मदत करतील असे वाटले होते मात्र तसे झाले नाही. तरीसुद्धा सांगोल्याच्या शाश्वत विकासासाठी ही निवडणूक लढवीत आहे.यासाठी आमची आम्ही ज्या संस्थेचे प्रतिनिधित्व करतो त्यामधील गुणवत्ता पाहता नगरपालिकेत सुद्धा आम्ही आदर्श कारभार करून दाखवू. त्यामुळे उघडा डोळे.. बघा नीट.. सांगोला नगरीच्या उज्ज्वल विकासासाठी, आदर्श कारभारासाठी विश्वेश झपके यांना संधी द्या..
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके
माजी नगराध्यक्ष
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



