सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव मल्हारवाडी करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक शहरे आणि गावांच्या नावात बदल करण्यात आला आहे. त्यातपद्धतीने रस्ते आणि रेल्वे स्थानकांची नावे देखील बदलण्यात आली आहेत. पण केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात भाजपप्रणित महायुतीचे सरकार आल्यापासून नामांतराच्या प्रक्रियेला मोठा वेग आला आहे. राज्यातील अहमदनगर (अहिल्यानगर), उस्मानाबाद (धाराशिव) आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यांची आणि शहरांची नावे बदण्यात आली आहेत.
त्यातच आता सांगोला तालुक्यातील निजामपूर गावाचे नाव बदलून मल्हारवाडी करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून निजामपूर गावाचे नाव मल्हारवाडी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक