अकोला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जोरदार शुभारंभ

0

अकोला (प्रतिनिधी): अकोला ता. सांगोला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत अकोला गावातील व पंचक्रोशीतील सर्व वयोवृद्ध महीला, १५ ते १८ वयोगटातील सर्व मुली, सर्व महीला यांच्या करीता महीला आरोग्य शिबिर व अकोला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे प्रधानमंत्री जन-आरोग्य योजनेतील आयुष्मान भारत कॉर्ड काढणेकामीचे शिबिर अकोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन अकोला ग्रामपंचायतीचे मा. सरपंच सौ.धनश्री शशिकांत गव्हाणे यांचेहस्ते करण्यात आले, शिबिराचे उद्घाटनापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबवलेल्या शिबिरास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकी अधिकारी श्रीयुत.महारनवर डॉक्टर व श्रीयुत. इनामदार डॉक्टर

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक-सेविका, शिपाई, रुग्णवाहिका चालक, गावातील सर्व आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर सर्व सन्माननीय पदाधिकारी, तसेच या अभियानांतर्गत लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला-पुरुष, रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थींनी, युवक- युवतींना लाभ देण्यात आला.

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here