सोनंद (प्रतिनिधी): चालू शैक्षणिक वर्षापासून शासनाने इयत्ता अकरावीचे प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केला असून सर्व प्रवेश प्रणाली ही ऑनलाइन केलेली आहे. इयत्ता अकरावी मध्ये चालू शैक्षणिक वर्षांमध्ये ऑफलाइन प्रवेश होणार नाही .अर्थातच इयत्ता दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी ही गोष्ट नवीनच आहे .त्यांना या प्रवेश प्रक्रियेचे पूर्ण आकलन व्हावे, कोणताही ताण येऊ नये म्हणून प्रशालेमध्ये संस्थापक अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी कोळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 21 रोजी प्रवेश प्रक्रिये वरती ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेमध्ये सोनंद केंद्रामधून फेब्रुवारी 2025 एसएससी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना निमंत्रित केले होते त्याचबरोबर केंद्रामधील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनाही निमंत्रित केले होते सदरची कार्यशाळा ही विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरली प्रशालेतील श्री एन जी शिंदे यांनी पूर्ण ऑनलाइन प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजून सांगितली तसेच वेबसाईट ओपन झाल्यापासून केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाविषयी मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही दिली प्राचार्य श्रीमती शेडसाळे एस डी यांनी केंद्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पर्यंत मोबाईल वरून या कार्यशाळेस संबंधित सूचना देण्याचे नियोजन केलेले होते त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे दाखले ही तहसील कार्यालयाकडून मंडळ स्तरावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन होईल असे सांगितले पालकांनी ताण घेऊ नये सर्व प्रवेश प्रक्रिया सुलभतेने पार पडण्यासाठी पुरेपूर सहकार्य प्रशाले कडून मिळेल असे मत व्यक्त केले प्राध्यापक राजेश म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले. सोनंद हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रेय महमाने सर, श्री टी के काशीद सर उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक