सोनंद (प्रतिनिधी): सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे मंगळवार दि. 9 सप्टेंबर रोजी एमआयटी कॉलेज आणि क्विक हिल् फाउंडेशन पुणे यांचे मार्फत सायबर शिक्षा फोर सायबर सुरक्षा उपक्रम अंतर्गत एमआयटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आळंदी आणि क्विक हिल् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने,” सायबर शिक्षा फोर सायबर सुरक्षा” संपन्न झाला.

या अंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सायबर गुन्हा विषयी जागरूक करणे’ त्यांना सुरक्षित डिजिटल नागरिक बनवणे’ फिशिंग ‘ऑनलाइन फसवणूक’ सोशल मीडियाचा सुरक्षित वापर’ पासवर्ड व्यवस्थापन या सर्व मुद्द्यावर कुमारी गायत्री पाटील तिने उत्कृष्टरित्या कार्यशाळा घेतली. प्रात्यक्षिके करून दाखवली एमआयटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राध्यापक अमित काळे आणि क्विक हिल फाउंडेशनचे अजय शिर्के यांच्या समन्वयाने या कार्यशाळेचे आयोजन होते आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ही आजची कार्यशाळा संपन्न झाली विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

आज ग्रामीण भागातील विद्यार्थी मोबाईलचा अमर्याद वापर करत आहेत वाचन संस्कृती हरवत आहे पाठांतर तर दूरची गोष्ट. मोबाईल वेड शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान करते पण वेळ ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य आहे तो वेळ अभ्यासाऐवजी मोबाईलच्या वापरामध्येच विद्यार्थी खर्च करत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अशा कार्यक्रमाने नकळत त्यांनाही जाणीव करून देणे, घडणारे सायबर गुन्हे कदाचित आपल्यालाही गुन्ह्यामध्ये ओढले जाणे इत्यादी गंभीर गोष्टी ही विद्यार्थ्यांना कार्यशाळेद्वारे जाणून घेण्याची संधी मुलांच्या समुपदेशनाची संधी मिळाली असे मत प्राचार्य श्रीमती शेडसाळे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी माझी प्राचार्य श्री महादेव कोळसे पाटील उपस्थित होते. त्यांनी कुमारी गायत्री पाटील व आदित्य भावकर यांचे अभिनंदन व कौतुक केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


