प्रतिनिधी (शशिकांत कोळी): जवाहर विद्यालय घेरडी शाळेच्या माध्यमातून विदयार्थ्यांनसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून जवाहर विद्यालय घेरडी यांच्या वतीने जवाहर सायकल बँक योजना हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कै. अनंतराव डोंगरे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय चंदनशिवे सर यांनी केले. तर तानाजी चंदनशिवे यांनी प्रशालेचा आतापर्यंतचा इतिहास सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक धनंजय डोंगरे यांनी जवाहर सायकल बँक योजनेची संकल्पना नियम व अटी सांगून गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये रवींद्र डोंगरे यांनी यापुढेही सायकल बँक योजनेस गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करू असे आश्वासन दिले. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र डोंगरे, संस्था सचिव उमेश डोंगरे, तानाजी चंदनशिवे ( माजीं उपसभापती पंचायत समिती सांगोला ), नवनाथ भोसले, बाबासाहेब त्रिगुणे सर, तसेच लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले व शेवटी सायकल वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक