प्रतिनिधी (शशिकांत कोळी): घेरडी ता. सांगोला जि.सोलापूर येथील कै. दगडू यशवंत पुकळे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन. घेरडी गावचे युवा नेते, उद्योगपती श्री यशवंत उर्फ पिंटू दगडू पुकळे यांचे वडील कैलासवासी दगडू यशवंत पुकळे हे काल सकाळी साडेपाच वाजता त्यांच्या राहत्या घरी मरण पावले.
अत्यंत शांत, संयमी व सतत बोलका स्वभाव असणारे प्रामाणिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाला नेहमी दिपस्तंभाप्रमाणे असणारे म्हणून संपूर्ण घेरडी गावाला परिचित होते.आज त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन मुली, सूना ,नातवंडे असा खूप मोठा परिवार असून पुकळे कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ईश्वरचरणी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री सोमा उर्फ आबा मोटे यांचे ते काका होते. रक्षाविसर्जन दिनांक 01 मार्च 2025 रोजी घेरडी या ठिकाणी सकाळी ठीक 8:00 वाजता होणार आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक