सांगोला तालुक्यातील हणमंतगावचे रहिवाशी दिपक उत्तम खांडेकर यांची डिपार्टमेंटल परिक्षेमधून पश्चिम रेल्वेत ज्युनियर इंजिनिअर पदी निवड झाली आहे.
त्यांची 2016 रोजी रेल्वे आर.आर.बी परिक्षा पास होऊन पश्चिम रेल्वेत इलेक्ट्रिक विभागात सहाय्यक पदी नियुक्ती झाली होती. 2021 मध्ये इलेक्ट्रिक टेक्निशियन पदी पदोन्नती झाली. टेक्निशियन मध्ये तीन वर्षे नोकरी केल्यानंतर पश्चिम रेल्वे मुंबई विभागाने LDCE (Limited Department Computation Exam) ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. सदर परिक्षा नोव्हेंबर 2024 ला पार पडली. यामध्ये त्यांना चांगले गुण मिळाले. नंतर मेडिकल होवून 28 एप्रिल 2025 रोजी अंतिम निकाल प्रसिद्ध आला आहे. यामध्ये त्यांची ज्युनियर इंजिनिअर पदी नियुक्ती झाली आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्रा. शाळा हणमंतगाव, माध्यमिक शिक्षण निजामपूर हायस्कूल निजामपूर येथे झाले. अकरावी सायन्स न्यू इंग्लिश स्कूल ज्यु काॅलेज सांगोला, बारावी सायन्स कै सौ. वत्सलादेवी महाविद्यालय जवळा येथून पूर्ण केले.त्यांनी पदवीचे शिक्षण डी वाय पाटील काॅलेज तळेगाव दाभाडे पुणे येथे पूर्ण केले. ग्रामीण भागात शिक्षण घेवून त्यांनी हे यश संपादन केले त्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक